News Flash

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

दिवाळीनिमित्त घराच्या आवारात बनविण्यात आलेल्या मातीच्या किल्ल्यात विजेचा प्रवाह सोडत असताना विजेचा धक्का बसून मयूर कडवे (

| November 4, 2013 03:27 am

दिवाळीनिमित्त घराच्या आवारात बनविण्यात आलेल्या मातीच्या किल्ल्यात विजेचा प्रवाह सोडत असताना विजेचा धक्का बसून मयूर कडवे (वय १६) या मुलाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी कल्याणमधील रोहिदास वाडय़ात ही दुर्घटना घडली.
मयूरने घराच्या परिसरात दिवाळीनिमित्त मातीचा किल्ला तयार केला होता. या किल्ल्यात विजेच्या दिव्यांचे सुशोभिकरण करण्यासाठी तो शेजारील मंदिरातून विजेचा प्रवाह घेत होता. यावेळी त्याला विजेचा जोराचा धक्का बसला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. मयूर इयत्ता सातवी इयत्तेत शिक्षण घेत होता. बाजारपेठ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 3:27 am

Web Title: child died of electric shock in wada
टॅग : Electric Shock
Next Stories
1 रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांचा राजावाडी रुग्णालयात धुमाकूळ
2 लक्ष मंगळाकडे!
3 वरदायिनी कोयनेतून उमटणार ‘लक्ष्मीची पावले’
Just Now!
X