08 March 2021

News Flash

‘वाडिया’तील बालक आईनेच चोरल्याचा संशय

परळच्या वाडिया रुग्णालयातून पळविलेले अर्भक आग्रीपाडा येथील कचराकुंडीत सापडल्याप्रकरणी संशयाची सूई आईकडेच सरकत आहे.

परळच्या वाडिया रुग्णालयातून पळविलेले अर्भक आग्रीपाडा येथील कचराकुंडीत सापडल्याप्रकरणी संशयाची सूई आईकडेच सरकत आहे. आग्रीपाडा पोलिसांनी मुलीचे पालक, रुग्णालय कर्मचारी यांचा जबाब नोंदविला असून नैराश्येच्या भरात आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, मुलगी अजूनही रुग्णालयात दाखल असल्याने तिच्या आईला अटक करणे अमानवी असल्याने पोलीसांनी आईवर अजूनही कारवाई केलेली नाही.
आग्रीपाडा परिसरात राहणारे मनिष आणि संपदा जोरे या दाम्पत्याला ३० एप्रिल रोजी मुलगी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मुलीला जोरे दाम्पत्याने वाडिया रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, बुधवारी सकाळी मुलगी अतिदक्षता विभागातून बेपत्ता असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. भोईवाडा पोलिसांकडे याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शहरातील सर्व पोलिसांना याची माहिती दिली. त्यावेळी आग्रीपाडा परिसरातील एका कचराकुंडीत तशाच वर्णनाची मुलगी सापडली. तपासाअंती सापडलेली मुलगी वाडिया रुग्णालयातून बेपत्ता झालेली असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात एक महिला मुलीला घेऊन जात असल्याचे दिसत होते. आग्रीपाडा पोलिसांनी मुलीच्या पालकांबरोबरच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून हे कृत तिच्या आईनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन) एस. जयकुमार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 12:36 am

Web Title: child robbery in wadia hospital
Next Stories
1 बडय़ा घोटाळ्यांबाबत मुख्यमंत्री गप्प का?
2 मच्छिमार कृती समितीचा खडसेंच्या निकटवर्तीयावर आरोप
3 जूननंतर वातानुकूलित गाडीच्या चाचण्या
Just Now!
X