संग्रहालयातील विविध दालनांचा परिचय करून देणारी सत्रे

मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ सध्या बंद असले तरीही येथील बालसंग्रहालयाची आभासी सफर करता येणार आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त संग्रहालयातील प्रदर्शने, संग्रहालयाच्या आवारातील वृक्ष ऑनलाइन पाहता येतील. संपूर्ण मे महिनाभर संग्रहालयाने आयोजित के लेली व्याख्याने, कार्यशाळा, कला प्रशिक्षण, इत्यादींच्या माध्यमातून संग्रहालयातील विविध दालनांचा परिचय करून घेता येणार आहे. ३० मेपर्यंत चालणारे हे शिबीर विनामूल्य आहे.

दर बुधवारी संग्रहालयातील प्रदर्शने ऑनलाइन पद्धतीने पाहाता येतील. ‘कष्टी किनारा’ या प्रदर्शनात विविध प्रकारच्या होड्या आणि जहाज निर्मिती यांविषयीची माहिती मिळेल. भारत, नेपाळ, भूतान या हिमालयीन प्रदेशांतील कलाकृ तींचेही प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. ‘द म्युझियम ट्री ट्रेल’ या प्रदर्शनात संग्रहालयाच्या आवारातील विविध वृक्ष पाहाता येतील. यात १०० वर्षे जुन्या ‘बाओबाब’ या आफ्रिकी वृक्षाचा समावेश आहे. मुंबईत के वळ ५ बाओबाब वृक्ष असून त्यापैकी एक संग्रहालयाच्या आवारात आहे.

संग्रहालयातील शिल्पे, दगडांपासून बनलेल्या वस्तू, यामागची कथा दर गुरुवारी मुलांना सांगितली जाईल. यात ३ ते १४ वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतील. निसर्गचित्र, गोंड आदिवासी कला, डूडल, नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा या दर शुक्रवारी होणाऱ्या सत्रांत १२ वर्षांवरील मुले सहभागी होऊ शकतात. ‘अ‍ॅनिमल क्रोनिकल्स’ या दर शनिवारी होणाऱ्या सत्रात ७ ते १६ वयोगटातील मुलांना जैवविविधता, अस्तित्त्व धोक्यात असणाऱ्या प्रजाती, प्राणी आणि माणूस यांच्यातील नाते यांची माहिती दिली जाईल. मानवी वस्तीत राहणारे प्राणी, पक्षी, कीटक यांच्या संवर्धनाविषयीचे ‘बॅकयार्ड बायोलॉजी’ हे सत्र दर शनिवारी होईल. ८ ते १२ वर्षे वयोगटासाठी हे सत्र आहे. तसेच संग्रहालयातील पक्षी दालनही ऑनलाइन पाहाता येईल. १६ वर्षांवरील मुलांना यात सहभागी होऊ शकतील.

३ वर्षांवरील सर्व मुलांसाठी दर रविवारी कथाश्रवणाचा कार्यक्रम होणार आहे. यात संग्रहालयातील वस्तूंच्या आधारे जगभरातील विविध देशांतील कथा सांगितल्या जातील. सर्व सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी ी५ील्ल३२@ू२े५२.्रल्ल या ईमेल आयडीवर संपर्क  साधावा.