पुण्याच्या अन्विता तेलंग हिने तयार केलेले ‘डुडल’ बालदिनी (१४ नोव्हेंबर) गुगल इंडियाच्या होमपेजवर झळकणार आहे. डुडल फॉर गुगल स्पर्धेत इयत्ता चौथी ते सहावीच्या गटात अन्विताला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. विविध दिवसांचे महत्त्व जाणत गुगल नेहमीच काहीतरी वेगळ्या संकल्पनेसह डुडल तयार करते. आजवर गुगलने नानाविध डुडल तयार केले आहेत. गुगलकडून बालदिनाच्या निमित्ताने ‘डुडल’ तयार करण्याची स्पर्धा घेतली जाते. भारतात २००९ पासून ही स्पर्धा सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेली ही स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांत घेतली जाते. दरवर्षी गुगल इंडियाकडून एक संकल्पना मुलांना दिली जाते. त्या संकल्पनेवर आधारित डुडल मुलांनी तयार करायचे असते. यंदा या स्पर्धेत पुण्याच्या अन्विता तेलंग हिने बाजी मारली. त्यामुळे आज गुगलच्या होमपेजवर अन्विताचे डुडल झळकत आहे.
विद्यार्थ्यांसाठी असलेली ही स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांत घेतली जाते. दरवर्षी गुगल इंडियाकडून एक संकल्पना मुलांना दिली जाते. त्या संकल्पनेवर आधारित डुडल मुलांनी तयार करायचे असते. यावर्षी ‘मी कुणाला काही शिकवू शकत असेन, तर ते काय असेल?’ अशा आशयावर आधारित संकल्पना देण्यात आली होती. स्पर्धेसाठी दिलेल्या संकल्पनेवर ‘प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका,’ असा विचार अन्विताने डुडलच्या माध्यमातून मांडला. बालेवाडी येथील विबग्योर हायस्कूलमध्ये सहावीच्या वर्गात ती शिकत आहे. कल्पकता आणि मांडण्यात आलेला विचार या आधारे आणि नागरिकांनी दिलेल्या पसंतीनुसार अन्विताच्या डुडलची निवड करण्यात आली आहे.