येत्या शनिवारी म्हणजे १२ सप्टेंबरला होऊ घातलेली ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धे’ची लेखी परीक्षा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १० ऑक्टोबरला होणार आहे. शनिवारी दुपारी ३.३० ते ५.३० दरम्यान या परीक्षेचे आयोजन होणार होते. आता ही परीक्षा याच वेळेत १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
राज्यभरातून ४८,५९५ इतके विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. एकूण २०८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ‘प्रात्यक्षिक स्पर्धा व मुलाखत या नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. यात कोणताही बदल केलेला नाही,’ असे आयोजक असलेल्या ‘मुंबई विज्ञान अध्यापक मंडळा’चे अध्यक्ष प्रताप थोरात यांनी स्पष्ट केले.