09 March 2021

News Flash

घणसोलीत मुलाची हत्या

तळवली येथील नोसील कॉलनीत राहणाऱ्या ऋतीकेश सोनावणे या १३ वर्षीय मुलाची सोमवारी शेजारच्या दुकानदाराने हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. काही दिवसांपुर्वी ऋतीकेश क्रिकेट खेळताना चेंडू

| May 21, 2013 01:52 am

तळवली येथील नोसील कॉलनीत राहणाऱ्या ऋतीकेश सोनावणे या १३ वर्षीय मुलाची सोमवारी शेजारच्या दुकानदाराने हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. काही दिवसांपुर्वी ऋतीकेश क्रिकेट खेळताना चेंडू कुंदन वैती याच्या दुकानातील काचेला लागल्याने त्याचा राग ठेवून ही हत्या झाल्याचे रबाले पोलिसांनी सांगितले.
१३ मे रोजी ऋतीकेश आपल्या मित्रांसोबत परिसरात क्रिकेट खेळत असताना चेंडू कुंदन वैती यांच्या दुकानातील काचेला लागला. त्यामुळे ऋतीकेशच्या वडिलांसोबत कुंदनचे कडाक्याचे भांडण झाले. त्याने ती काच नव्याने बसवून देण्याची मागणी केली होती. पण, ही मागणी सोनावणे यांनी मान्य केली नाही. त्यामुळे वैती यांचा संताप अनावर झाला आणि यातूनच ही हत्या झाली, असे पोलिसांनी सांगितले. ऋतीकेषचा मृतदेह तळवली येथील खाडी किनारी भागातील झुडपामध्ये आढळून आला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कुंदनला ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2013 1:52 am

Web Title: childs murder in ghansoli
टॅग : News
Next Stories
1 बालरोग तज्ज्ञाअभावी पालिका रूग्णालयात अर्भकाचा मृत्यू
2 झैबुनिसा काझी, पारकर यांची न्यायालयापुढे शरणागती
3 आजही इथे सट्टेबाजांचाच विजय होतो..
Just Now!
X