03 March 2021

News Flash

नाताळ, नववर्षांच्या स्वागतासाठी पहाटे पाचपर्यंत मद्यप्राशनास मुभा

राज्यातील सर्व मद्यविक्री परवाने असलेल्या हॉटेल्समध्ये मद्य प्राशन करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क

| December 25, 2012 04:43 am

राज्यातील सर्व मद्यविक्री परवाने असलेल्या हॉटेल्समध्ये मद्य प्राशन करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. ही परवानगी मंगळवार २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दोन दिवसांसाठीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२५ आणि ३१ डिसेंबर रोजी मोठय़ा प्रमाणात मद्यविक्री होत असते, असे सांगून डॉ. मुखर्जी म्हणाले की, मद्यविक्रीची दुकाने इतरदिवशी १०.३० वाजेपर्यंत सुरू असतात तर बार आणि पबना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असते. २५ आणि ३१ डिसेंबर रोजी ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:43 am

Web Title: christmas new year welcome party taking alcohol is permited before morining five
टॅग : Christmas
Next Stories
1 नव्या विद्युतप्रणालीवरील उपनगरी गाडी आजपासून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात
2 प्राप्तिकर खात्याच्या सहाय्यक आयुक्तास लाचप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरी
3 पोलिसांसमोर तरूणीने कबूल केले स्वत:च्या अपहरणाचे नाटय़!
Just Now!
X