16 November 2019

News Flash

चर्चगेट स्टेशन येथे होर्डिंग कोसळून वृद्धाचा मृत्यू

होर्डिंग कोसळण्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

छाया: गणेश शिर्सेकर

चर्चगेट स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. मधुकर नार्वेकर (वय ६२) असे या वृद्धाचे नाव असून संबंधित होर्डिंग हे पश्चिम रेल्वेअंतर्गत येत असल्याचे समजते.

चर्चगेटमध्ये स्टेशन परिसरातील होर्डिंग बुधवारी दुपारी कोसळले. या होर्डिंगखाली सापडून मधुकर नार्वेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. होर्डिंग कोसळण्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

चर्चगेट स्थानकाच्या बाहेरील बाजूस महात्मा गांधी यांचे भित्तीचित्र आहे. या भित्तीचित्राचा काही भाग रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यावर कोसळला. हे भित्तीचित्र ब्राझीलच्या कलाकाराने साकारले आहे.

First Published on June 12, 2019 3:17 pm

Web Title: churchgate one person dies hoarding collapse in railway premises