News Flash

सिगारेट-बिडी सुटय़ा विकल्यास कारवाई?

सिगारेट वा बिडी विक्रेत्यांना खुल्या स्वरुपात विकता येणार नाही.

सिगारेट वा बिडी विक्रेत्यांना खुल्या स्वरुपात विकता येणार नाही. सिगारेट किंवा बिडी फक्त पाकिट स्वरुपातच विकणे बंधनकारक असेल. अन्यथा वैध मापन कायद्यातील तरतुदीनुसार अशा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

वैधमापन विभागाचे महानिरीक्षक व संचालक अमिताभ गुप्ता यांनी उत्पादक कंपन्यांना नोटिसा पाठवून सुधारीत वैधमापन कायद्याची अमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. या कायद्यानुसार किरकोळ विक्री किंमत म्हणजेच कमाल किंमत ही पाकिटबंद उत्पादनाला लागू असते. अशा पाकिटबंद उप्तादनातील खुल्या वस्तू विकता येत नाही, असे वैधमापन कायद्यातील कलम १८ सांगते. सिगारेट वा बिडीच्या पाकिटांवर आरोग्यासाठी घातक असे लिहिलेले असते. परंतु या पाकिटातील सिगारेट वा बिडी विकली जाते तेव्हा त्यावर तो उल्लेख नसतो. त्यामुळे खुल्या स्वरुपात सिगारेट वा बिडी विकणे हा वैधमापन कायद्यानुसार गुन्हा होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 12:45 am

Web Title: cigarette or bidi vendors will not be sold in the open form
टॅग : Cigarette
Next Stories
1 अल्पवयीन मुलीचा सौदा करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात
2 महाराष्ट्र सदनप्रकरणातील मुख्य वास्तुरचनाकाराचे निधन
3 दोषी ठरविलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू
Just Now!
X