27 May 2020

News Flash

धार्मिक तेढीच्या भीतीने पालिकेकडून परिपत्रक मागे

काही अटींवर मृतदेहाचे दफन करण्यास परवानगी

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या दफनाबाबत..

करोना आजाराने दगावलेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार कसे करावे, याबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली. आजाराचा संसर्ग वाढू नये, यासाठी मृहदेहाचे दफन करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मात्र, धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या भीतीने प्रशासनाने हे परिपत्रक मागे घेत काही अटींवर मृतदेहाचे दफन करण्यास परवानगी देण्याचे ठरवले.

करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यास मृतांचा आकडाही वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मृतदेहाद्वारे विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोमवारी नियमावली जाहीर केली होती. मृतदेहाला अजिबात स्पर्श न करता शास्त्रीय पद्धतीने हे अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या नियमावलीमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने उशिरा हे परिपत्रकच मागे घेतले. मृतदेह दफन करायचा असल्यास मुंबईबाहेर नेऊन दफन करण्याची अट काढून टाकण्यात आली.

सशर्त परवानगी

मृतदेहाचे दफनच करायचे असल्यास त्यासाठी मोठी दफनभूमी असेल तरच परवानगी दिली जाणार आहे. रहिवासी भागात त्याचा संसर्ग होणार नाही, अशा शास्त्रीय पद्धतीनेच दफन करावे लागेल. मृतदेह दफन करण्याबाबत नियमावली जारी करण्यात येणार असून संपूर्ण जबाबदारी संबंधितांचीच राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 1:06 am

Web Title: circular was withdrawn municipality for fear of religious rush abn 97
Next Stories
1 ऐन टाळेबंदीत वीज ग्राहकांना धक्का
2 समाजमाध्यमांत गझल बहर!
3 शिधावाटप दुकानांमध्ये ३० टक्केच धान्यसाठा
Just Now!
X