News Flash

नियोजनशून्यतेचे काय करायचे?

नागरीकरणाचा वेग वाढत असला तरी ही प्रक्रिया नियोजनपूर्वक व्हावी अशी कसलीच व्यवस्था सध्या महाराष्ट्रात नाही. वाट्टेल तिथे आणि वाट्टेल

| October 28, 2013 02:48 am

नागरीकरणाचा वेग वाढत असला तरी ही प्रक्रिया नियोजनपूर्वक व्हावी अशी कसलीच व्यवस्था सध्या महाराष्ट्रात नाही. वाट्टेल तिथे आणि वाट्टेल तशी बांधकामे फोफावत असल्याने आणि मोकळय़ा जागा अतिक्रमणांमुळे नष्ट होत असल्याने नियोजनशून्यतेवर परिणामक पर्याय शोधण्याची वेळ आली असून त्यांचा वेध ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या चर्चासत्रातील दुसऱ्या दिवशी ‘नियोजनशून्यतेचे काय करायचे?’ या पहिल्या सत्रात होणार आहे.
लोकसत्ता आणि सारस्वत बँकेतर्फे सुरू झालेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमातील दुसऱ्या पर्वात ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या विषयावर चर्चासत्र होत आहे. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या या चर्चासत्रात प्रत्येक दिवशी तीन विषयांवर परिसंवाद होत आहे.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात राज्यातील नागरीकरणाच्या प्रक्रियेचा बोऱ्या वाजवणाऱ्या नियोजनशून्यतेच्या समस्येचा ऊहापोह केला जाणार आहे. नागरीकरणचा वेग वाढत असल्याने नगरांचा-महानगरांचा आकार वाढत चालला आहे. शहरांचे तथाकथित विकास आराखडे ही केवळ राजकारण्यांची आणि प्रशासनाचे ‘हित’ जपणारी कागदांची भेंडोळी ठरत आहेत. शहर वाढत असताना कशा रितीने नियोजन हवे, आर्थिक-राजकीय स्वार्थासाठी नियोजनाला हरताळ फासणाऱ्यांचे काय करायचे, मुळात प्रशासन आणि सत्ताधारी नियोजन नीट करत आहेत काय? त्यातील धोरणात्मक आणि दूरदृष्टीच्या अभावावर कशी मात करता येईल, काय बदल करावे लागतील यांची चर्चा या सत्रात होईल.
आधी अतिक्रमणे करायची आणि नंतर ती कायम करा म्हणून आंदोलन करायचे अशा प्रवृत्तींमुळे नजीकच्या भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल. समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) हा उपाय असू शकतो काय? या मुद्दय़ांचाही परामर्श या सत्रात घेण्यात येईल. त्याचबरोबर नियोजनपूर्वक विकास ही केवळ आदर्शवादी कल्पना न राहता प्रत्यक्षात ती कशी उतरवता येते, त्याची काही उदाहरणे आहेत काय याचाही आढावा या सत्रात घेतला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 2:48 am

Web Title: civilization tempo increase as planning decrease in mumbai
Next Stories
1 शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतूसाठी परदेशी गंगाजळी ?
2 वनराई पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यू
3 भविष्य निधीबाबत सूचना, तक्रारी मांडण्याचे आवाहन
Just Now!
X