21 November 2019

News Flash

आठवीतील विद्यार्थ्यांची आत्महत्या

या विद्यार्थ्यांची आई बँकेत अधिकारी असून वडील व्यावसायिक आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : वडाळा येथील भक्ती पार्क परिसरातील गिरनार इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून (गच्चीतून) उडी मारत आठवीतील विद्यार्थ्यांने गुरुवारी दुपारी आत्महत्या केली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत चौकशी सुरू केली.

या विद्यार्थ्यांची आई बँकेत अधिकारी असून वडील व्यावसायिक आहेत. दुपारी शाळेतून परतताच खासगी शिकवणीला गेलेला विद्यार्थी घाईघाईने इमारतीत परतला. मात्र घरी न जाता थेट गच्चीत जाऊन त्याने खाली उडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांपाठोपाठ आणखी दोन मुले इमारतीत जाताना आढळली होती. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांने उडी मारण्याआधी इमारतीतून माघारी फिरताना ती दिसतात. पोलीस या माहितीची खातरजमा करत असून आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेत आहेत.

First Published on July 12, 2019 12:05 am

Web Title: class viii student commit suicide zws 70
Just Now!
X