30 September 2020

News Flash

सफाई कामगाराची गोळ्या घालून हत्या

वर्तकनगर परिसरात साई मंदिरातून दर्शन घेऊन आपल्या घरी निघालेल्या अर्जुन तुशामकर (१९) या तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

| September 20, 2014 01:42 am

वर्तकनगर परिसरात साई मंदिरातून दर्शन घेऊन आपल्या घरी निघालेल्या अर्जुन तुशामकर (१९) या तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारी व्यक्ती तुशामकर याच्या ओळखीतील असण्याची शक्यता पोलीसांच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वागळे इस्टेट रोड नंबर ३४ येथे राहणारा अर्जुन हा सफाई कामगार असून त्याचे इंदिरानगर येथील एका तरूणीशी प्रेमसंबध होते. गुरुवारी अर्जुन त्या तरुणीसह वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता. दर्शन झाल्यानंतर ते दोघ सावरकरनगर येथून पायी घराकडे जात होते. मात्र सिगारेट ओढायचे आहे असे सांगून त्याने त्या तरूणीला तेथून पुढे जाण्यास सांगितले. अजुर्नला येण्यास उशीर झाल्याने त्या तरूणीने त्याला मोबाईल करुन विचारणा केली. तेव्हा ‘मित्राला भेटून येतो’ असे त्याने सांगितले. त्याचवेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. गोळीचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी धावाधाव केली, मात्र त्यापूर्वीच अर्जुनचा मृत्यू झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:42 am

Web Title: cleaning employee shot dead
Next Stories
1 ठाण्यात मंगळवारी पाणी नाही
2 मुंबई विद्यापीठात ऑक्टोबर परीक्षा ५ नोव्हेंबरपासून
3 मराठीची भक्ती, पण इंग्रजीची सक्ती!
Just Now!
X