News Flash

मध्य रेल्वे मार्गावर १५ नाल्यांची सफाई

मुंबईतील नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे पालिकेतर्फे पूर्ण करण्यात आली आहेत

पावसाळ्यात लोकल वेळापत्रक सुरळीत राहणार?

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंडदरम्यान रेल्वे रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांमधील (कल्व्हर्ट) गाळ पालिके ने काढला आहे. त्याची स्वच्छता करून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विनंती केल्यानंतर ही कामे पालिका प्रशासनाने अवघ्या पंधरा दिवसांत पूर्ण केली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचणार नाही अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.

मुंबईतील नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे पालिकेतर्फे पूर्ण करण्यात आली आहेत.  त्याचप्रमाणे तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत स्वच्छतेची तसेच रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. त्याकरिता पालिका रेल्वे प्रशासनाला निधी देत असते. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोहमार्गावर येऊ नये, यासाठी ही स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई पालिकेला पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत विनंती केली. मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याकारणाने त्यांनी महानगरपालिकेला रेल्वे हद्दीत हे काम करण्यासाठी विनंती केली. महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी रेल्वे प्रशासनाची विनंती मान्य केली. त्यानंतर पर्जन्य जलवाहिन्या खात्याने पाण्याच्या फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र वापरून १८ पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण केली, तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मस्जिद स्थानकदरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ, करी रोड ते परळ दरम्यान, परळ ते दादर दरम्यान जगन्नाथ भातमकर पुलाखाली, दादर ते माटुंगा दरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीव (सायन) दरम्यान, शीव ते कुर्ला दरम्यान, कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ, कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ, भांडुप ते नाहूरदरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.

एकूण ११६ नाले

तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ नाले आहेत. त्यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ नाले आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छता करणे आव्हानात्मक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:02 am

Web Title: cleaning of 15 nallas on central railway line akp 94
Next Stories
1 सीसीटीव्ही प्रकल्प कूर्मगतीने
2 खेरवाडीमध्ये घराची भिंत पडून एक ठार
3 नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
Just Now!
X