News Flash

सफाई कर्मचारी बनले लिपीक; वसई-विरार महापालिकेतील मोठा घोटाळा उघड

पालिकेचे ४७० सफाई कर्मचारी बनले होते लिपीक

संग्रहित छायाचित्र

वसई-विरार महापालिकेतील ४७० सफाई कर्मचारी मागील दहा वर्षांपासून सफाई न करता पालिकेचा ‘फुकट’ पगार घेत असल्याचे उघड झाले आहे. सफाईचे काम न करता हे कर्मचारी पालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सेवा देत होते. यामुळे पालिकेचा खाजगी ठेकेदाराला १२० कोटी रूपयांचा वार्षिक ठेवा द्यावा लागत होता. आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना पुन्हा मूळ कामात लावले असून यामुळे महिन्याला २५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सध्या पालिकेच्या अनावश्यक खर्चात कपात करण्यास सुरवात केली आहे. पालिकेचा सर्वात मोठा खर्च हा दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छतेवर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. शहराची विभागणी २० क्षेत्रात करण्यात आली असून त्यात ठेकेदरांमार्फत साफसाई केली जाते. त्यासाठी १२० कोटी रुपये वार्षिक खर्च येतो. त्यावेळी तपास केला असता पालिकेचे ४७० सफाई कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. मात्र हे ४७० कर्मचारी साफसाईन न करता पालिकेच्या विविध विभागात, पदाधिकाऱ्यांकडे काम करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

स्वत:चे ४७० कर्मचारी असताना बाहेरील ठेकेदाराला अनावश्यक कोट्यावधी रुपये दिले जात होते. त्यामुळे आयुक्तांनी त्वरीत या कार्यालीयनी कर्मचारी बनलेल्याय सफाई कर्मचाऱ्यांना कामावर जुंपले आहे. यामुळे आता पालिकेचे दरमहा २५ कोटी रुपये वाचणार असल्याची माहिती आयुक्त गंगाथरन यांनी दिली.

याबाबत माहिती देताना आयुक्त गंगाथरन यांनी सांगितले की, “आजवर हा मोठा घोटाळा पालिकेत सुरू होता. त्याबद्दल कुणी आवाज उठवला नाही. हे कर्मचारी कुणा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात, इतर विभागात काम करून पालिकेचा पैसा आणि इतर फायदे लाटत होते. दुसरीकडे सफाई कर्मचा-यांचा तुटवडा असल्याने ठेकेदाराकडून काम करवून घ्यावे लागत होते. तो देखील योग्य काम करत नव्हता. याशिवाय या कंत्राटी कामगारांना पालिकेच्या तिजोरीतून बोनसही द्यावा लागत होता. मात्र, आता पालिकेच्या तिजोरीची होणारी लूट थांबली आहे. हे ४७० सफाई कर्मचारी कार्यालयीन लिपिक बनले होते. ते पगार शासनाचा घेत होते आणि सेवा मात्र इतरांना देत होते. यापैकी १५० सफाई कर्मचाऱ्यांना आता कोव्हीड रुग्णांच्या सेवेसाठी पालिकेच्या विविध कोव्हीड केंद्रात आणि रुग्णालयात कामाला लावण्यात आले आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 5:15 pm

Web Title: cleaning staff became clerks vasai virar municipal corporation scam exposed aau 85
Next Stories
1 “करोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही”, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र
2 #MissionBeginAgain: ठाकरे सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध शिथील
3 मुदत संपलेल्या दीड हजार ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय
Just Now!
X