मुंबई महानगर भागांत तीन नवीन मेट्रो प्रकल्पांना MMRDA च्या बैठकीत मंजुरी दिली आहे. पाचव्या फेजच्या या मेट्रोची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. यामध्ये गायमुख – शिवाजी चौक ( मिरारोड ), वडाळा – सीएसएमटी, कल्याण – डोंबिवली – तळोजा याचा समावेश आहे. यामधील कल्याण-डोंबिवली-तळोजा या 20.75 किमी मार्गावर १७ स्थानके असणार आहेत. याचा अंदाजे खर्च ४१३२ कोटी रूपये असेल. वडाळा सीएसटी या ११.४ किमीमध्ये दहा मेट्रो स्थानके असणार आहेत. याचा अंदाजे खर्च ८७३९ रूपये असणार आहे. गायमुख-शिवाजी चौक(मिरा रोड) या ११.२ किमीच्या मेट्रो मार्गामध्ये चार स्थानके असणार आहेत. याचा अंदाजे खर्च ४४७६ कोटी रूपये असणार आहे.

CM also approved DPR for Wadala-CSMT Mumbai Metro 11.

CM approved DPR for Metro 10.

ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाचा अहवाल –

महानगर विकास प्राधिकरणाने वडाळा-घाटकोपर ते गायमुख या मेट्रो प्रकल्पावर काम सुरू केले आहे. पुढे ठाण्यापासून भिवंडी कल्याणपर्यंतही मेट्रोप्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाना पूरक ठरेल असा अंतर्गत मेट्रोचा आराखडा महापालिकेने महामेट्रोच्या (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मदतीने तयार केला आहे. या वर्तुळाकार मार्गावर २० उन्नत आणि २ भुयारी स्थानके उभारण्यात येणार आहेत. जुने ठाणे शहर, वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि घोडबंदरच्या अंतर्गत भागांतून मार्गाची आखणी करण्यात आली आहे. कळवा तसेच आसपासच्या परिसरात अंतर्गत मेट्रो नेण्यात येणार नाही.

संभाव्य प्रवासीसंख्या

अहवालानुसार २०२५ मध्ये अंतर्गत मेट्रोमधून दररोज ५.७६ लाख, २०३५ मध्ये ७.६१ लाख आणि २०४५ मध्ये ८.७२ लाख प्रवासी ये-जा करतील. या मेट्रोचा वेग प्रति तास ८० किमी इतका असणार आहे. तसेच कासावडवली येथील १८ हेक्टर जागा देखभाल सुविधेकसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, धातूशोधक, अशा उपाययोजनाही केल्या जाणार आहेत.

अंतर्गत मेट्रोचे स्वरूप

नवीन स्टेशन, घोडबंदर आणि ठाणे स्टेशन अशी वर्तुळाकार मार्गिका असेल. २२ स्थानके प्रस्तावित असून ठाणे स्थानक ते प्रस्तावित नवीन स्थानकापर्यंतची मार्गिका भुयारी तर उर्वरित उन्नत असणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरतील अंतर्गत वाहतूक सेवा अधिक जलद होणार असून वाहतूक कोंडी सुटेल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रकल्पाची आखणी पूर्णत ठाण्याच्या पश्चिम भागासाठी करण्यात आली आहे. साकेत, वागळे इस्टेट पुढे वर्तकनगर, उपवन आणि घोडबंदर मार्गातील वेगवेगळ्या भागांत हा मार्ग आखण्यात आला आहे.