राज्यात मराठा आरक्षण लागू होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. जेव्हा आरक्षण देण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री सांगत होते की, कोर्टात टिकणार नाही. कोर्टात बाजू नीट मांडली गेली नाही ही वस्तुस्थिती होती, आणि आता सन्मानिय न्यायालयाचे न्यायाधीश स्वत: मराठा आरक्षणाचं काय झालं ? आरक्षणाचा अहवाल कधी सादर करणार ? असं विचारत आहेत. याचा अर्थ टाळाटाळ करण्याची भूमिका या सरकारने घेतली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
मराठा आरक्षणावरुन न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार हल्ला केला.
समाजकल्याण मंत्रालयाच्या मागासवर्गीय विभागाकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. या विभागाने भाजपाच्या ‘सारथी’ नावाच्या संस्थेकडे अहवाल तयार करण्यासाठी दिला आहे. त्यांना आदेश देवून अहवाल तयार होत नाही. राज्यात मराठा, मुस्लिम आरक्षण लागू होवू नये यासाठी सरकार टाळाटाळ करण्याची भूमिका घेत आहे. आता कोर्टाने भूमिका घेतल्यानंतर नाईलाजाने सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 7:05 pm