मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर दोषारोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. मुंबईत विकसकाकडून ‘झोपु’वासीयांना भाड्यापोटी देण्यात येणारी रक्कम अॅक्सिस बँकेतच जमा करण्याच्या मुद्द्यावरून दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अमृता फडणवीस यांनी वशिलेबाजी केल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यानंतर अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या ट्विट्सविरोधात दिग्विजय सिंहांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत माफी मागा किंवा ट्विट्स परत घ्या, नाहीतर अब्रूनुकसानीच्या खटल्याला तयार राहा, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष असल्यानेच बँकेला अनुकूल असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बँकेला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला. हा प्रकार म्हणजे वशिलेबाजीची हद्द झाली, अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली होती.

ही तर वशिलेबाजीची हद्द ; दिग्विजय सिंहाची अमृता फडणवीसांवर टीका