24 September 2020

News Flash

मुंबई परिसरात धोका वाढला

नागरिकांचा ‘मुक्त संचार’ रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अपेक्षित नाही. यामुळे आजवर अटोक्यात असलेली ही साथ वाढून आव्हान उभे राहील असे सांगताच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पोलिसांना दिले.

तसेच तसेच कामाशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मुभाही दिली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई,

मीरा-भाईंदर,भिवंडी आदी  शहरांमध्ये मोकाटपणे फिरणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला जाईल. पावसाळा, करोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी  मुंबई पोलिसांनी घातलेल्या २ किमी अंतराच्या निर्बंधाचे  समर्थन करताना हे आदेश दिले.  काही निर्बंध शिथिल करताच ८० टक्के लोक बिनकामाचे बाहेर फिरत आहेत. त्यामुळे लोकांच्या मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणे गरजेचे आहे.

नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर तुम्ही धोका वाढवीत आहात हे लक्षात ठेवा,असा इशाराही  दिला. घराच्या आसपास जीवनावश्यक वस्तू, औषध हे सर्व काही मिळू शकते अशी परिस्थिती मुंबईत आहे.   उद्याने, मैदाने यांमध्ये जायचे आहे तर नजीकच्या ठिकाणी जाऊ शकता. आता तर आपण अनेक व्यवहार खुले केले आहेत, त्यामुळे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:19 am

Web Title: cm orders to stop free movement of citizens in mumbai area abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउन की अनलॉक या संभ्रमात ठाकरे सरकार : मनसे
2 Mission Begin Again: व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंनी उडवली ठाकरे सरकारची खिल्ली
3 मान्सून अपडेट : मुंबईत पावसाचा जोर वाढणार, ३ ते ५ जुलै दरम्यान मुसळधार
Just Now!
X