30 September 2020

News Flash

पोलिसांच्या धक्काबुक्कीप्रकरणी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

वरळी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या सदस्यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

| March 3, 2015 03:04 am

वरळी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या सदस्यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.   रविवारी रात्री वरळीच्या नॅशनल स्पोर्टस क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी क्लबच्या परिसरातील वाहतूक पोलिसांनी रोखून ठेवली होती आणि सदस्यांना पोलिसांनी क्लबमध्ये जाण्यास मज्जाव केला. काही सदस्यांनी याचा जाब विचारताच पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकाराचे व्हिडियो चित्रण सोमवारी माध्यमांमध्ये प्रसारित झाले. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत ट्विटरवरून दिलगिरी व्यक्त केली. असे व्हिआयपी कल्चर आवडत नसून यापुढे अपवाद वगळता मलाही सर्वसामान्यांप्रमाणे वाहतूकीचे नियम लागू करावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 3:04 am

Web Title: cm regret on behalf of club members over clashes with police
Next Stories
1 शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक
2 मुले चोरण्याच्या वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांना अटक
3 निरुपम यांच्याकडून वाढीव चटईक्षेत्राचे समर्थन
Just Now!
X