मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही मंत्री थेट वर्षा बंगल्यावर पोहचणार आहेत. तर काही ऑनलाइन सहभागी होणार आहेत. राज्यातील करोनाची स्थिती, लॉकडाउन या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत नेमका काय विषय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र लॉकडाउनबाबत काय निर्णय घ्यायचा? यावरची चर्चा कदाचित या बैठकीत होऊ शकते.
या बैठकीत काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंची ही आढावा बैठक असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार, सर्व महत्त्वाच्या विषयांवर आणि खात्यांवर प्रत्येक मंत्र्याशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. या बैठकीत करोना आणि लॉकडाउन याबाबत काय चर्चा होणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 5:26 pm