नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असं आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक खास पत्रचं लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र आतापर्यंत कसा लढला हे सांगण्याबरोबरच नवीन वर्षामधील परिस्थितीसंदर्भातही भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गेल्या वर्षभरात संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहाभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने करोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी करोना काहीश्या प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रऊानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत.

पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असं मुख्यमंत्र्यांनाही पत्रात म्हटलं आहे.

आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करत आहोत. आथा आपल्याला मागे परतायचे नाही. करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आथा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. व्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मिती संकटे नेहमीच येतात परंतू त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थीचा अतिशय जिद्धीने सामना करती असलेल्या डॉक्टर, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्राचा शेवट केलाय.