मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करीत मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट केले.
पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केल्यावर या संदर्भात काही ध्वनिफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असली तरी या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे. मंत्र्यांसह सर्वसंबंधितांची चौकशी करून पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:14 am