मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका

मुंबई : महाराष्ट्र हे ‘मॅग्नेटिक’ राज्य आहे. त्यामुळेच देश-विदेशातील उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. परिणामी येथील उद्योगांना आपल्याकडे ओढण्याचा कोणी कितीही प्रयत्न के ला तरी त्यांना यश मिळणार नाही, आम्हीही स्पर्धेला सज्ज आहोत. राज्यातील एकही उद्योग बाहेर नेऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मांडली.

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
‘त्यांना’ रामभक्त जागा दाखवतील; ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन

राज्यातील उद्योगांना उत्तर प्रदेशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येत असून उद्योजक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या या भेटीवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात नवीन राजकारण सुरू झाले आहे. स्पर्धेला घाबरत नाही असे ठाकरे यांनी ठणकावून सािंगतले. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते. यावेळी ‘मिशन एंगेज’ पुस्तिकेचे तसेच डिजिटल आर्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले.