30 September 2020

News Flash

उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद, कंगना, करोना प्रकरणी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

आज दुपारी १ वाजता साधणार महाराष्ट्राशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. कंगना प्रकरण, करोना, लॉकडाउन आणि मराठा आरक्षण या विषयांवर ते काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. cmomaharashtra च्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजवरुन उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं भाष्य केलं होतं. त्यानंतर बराच वाद झाला होता. या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. आता आज जनतेशी जेव्हा मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत तेव्हा ते या मुद्द्यावर काय बोलणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. आज होणाऱ्या त्यांच्या संवादात ते मराठा आरक्षण विषयावर नेमकी काय भूमिका घेणार आहेत हेदेखील मांडू शकतात.

करोना आणि लॉकडाउनवरही बोलण्याची शक्यता

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मात्र रोज रुग्णसंख्या वाढते आहे. तसेच महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यूही वाढत आहेत. या मुद्द्यांवर आणि लॉकडाउन अनलॉकच्या मुद्यांवर ते आज महाराष्ट्राच्या जनतेला काही विशेष दिलासा देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आज दुपारी १ वाजता ते महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेनेच यासंदर्भातली माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 11:06 am

Web Title: cm uddhav thackeray will interact with maharahta via social media scj 81
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 महाराष्ट्रात ‘ठाकरे ब्रँड’चा जोर हवा, संजय राऊत यांची राज ठाकरेंना भावनिक साद
2 “जिवंत रूग्णास मृत घोषित केल्याचा ‘तो’ व्हिडिओ दिशाभूल करणारा”
3 मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीला भाजपाचा पाठिंबा मिळणं दुर्दैवी-संजय राऊत
Just Now!
X