News Flash

VIDEO : वर्षा बंगल्यातील भिंतींवर उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

यावरून राजकारण मात्र तापू लागल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील भिंतींवर काही अपशब्द लिहिल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या सुरूवातीच्या काही अक्षरांचा उल्लेख करत बंगल्याच्या भिंतीवर काही अपशब्द लिहिण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ‘भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशीही वाक्य भितींवर लिहिण्यात आली आहेत. यासंदर्भात एक व्हिडीओ समोर आला आहे. परंतु हे कोणी लिहिलं याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी बंगला सोडला त्यावेळी भितीवर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिला नव्हता. हे अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी लोकांना सर्व काही समजतं असं म्हटलं आहे.


आम्हाला वर्षा बंगला सोडून जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. जेव्हा आम्ही बंगला सोडला त्यावेळी सर्वकाही ठीक होतं. बंगला सोडल्यानंतर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी गेलो नाही. जे काही लिहिलं आहे ते पाहून आश्चर्य वाटत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या. दरम्यान, हा व्हिडीओ कोणी तयार केला आणि तो सोशल मीडियावर कसा आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु आता यावरून राजकारण मात्र तापू लागल्याचं दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 11:56 am

Web Title: cm varsha bungalow controversial statements and words written on wall politics jud 87
Next Stories
1 पीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, सरकारने पुनर्विचार करावा – राजू शेट्टी
2 मुंबईतील आगीत दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता
3 मुंबई महानगराचा विकास म्हणजे केवळ काँक्रीटीकरण नव्हे – मुख्यंमत्री
Just Now!
X