26 September 2020

News Flash

सहकारी संस्थांचे पदाधिकारी मार्चपर्यंत कायम

करोनाची परिस्थिती पाहून डिसेंबरमध्ये यात बदल करण्याबाबतचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व सहकारी संस्थांना आर्थिक वर्षांतील लेखापरीक्षण तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने गुरुवारी घेतला. त्याचप्रमाणे मुदत संपलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या विद्यमान व्यवस्थापन समितीलाच नवीन निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सहकार कायद्यातील तरतूदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरपूर्वी तर वार्षिक लेखापरिक्षण ३१जुलैपूर्वी करून घेणे बंधनकारक आहे. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्याने ही कालमर्यादा वाढविण्याची मागणी राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाने केली होती. त्याचप्रमाणे अन्य सहकारी संस्थांनीही केलेल्या मागणीचा विचार करून मुदत वाढविण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्वच सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढविण्यात आली असून लेखापरिक्षण अहवाल सादर करण्यास ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करोनाची परिस्थिती पाहून डिसेंबरमध्ये यात बदल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही सहकारमंत्र्यानी सांगितले.

त्याचप्रमाणे २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या गृह निर्माण संस्थांची पाच वर्षांची मुदत संपली असेल, अशा संस्थांवरील समिती सदस्य नवीन समिती अस्तित्वात येईपर्यंत नियमितपणे सदस्य म्हणून कायम ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पाच वर्षांची मुदच संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूत गिरणी, बाजार समित्या, सेवा सोसायटी आणि गृहनिर्माण संस्था अशा ४८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:19 am

Web Title: co operative office bearers remain till march abn 97
Next Stories
1 फसलेल्या प्रयोगाचा पुन्हा घाट!
2 करोना नियंत्रणासाठी प्रत्येक गावात दक्षता समिती- मुख्यमंत्री
3 पालकांचीही ऑनलाइन शाळा!
Just Now!
X