कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. वरळी सी लिंक जवळ खोदलेल्या खड्ड्यात पडून त्या मुलाचा मृत्यू झाला.

कोस्टल रोडच्या बांधकामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. अशातच वरळी सी लिंकजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका मुलाला आपले प्राण गमवावे लागले. या खड्ड्यात पाणी असल्याने त्यात तो मुलगा बुडाला. दरम्यान, ही घटना पाहिल्यानंतर स्थानिकांनी त्याला त्वरित रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वीच गोरेगावात एक चिमुरडा नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या मुलाचा शोध घेण्यात आला होता. परंतु अद्याप त्याला शोधण्यात यश आले नाही.