सलग चौथ्या दिवशी उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमान २० अंशापेक्षा कमी नोंदविण्यात आले. तर दुसरीकडे आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, कमाल तापमानात मात्र घट झालेली नाही.
गेल्या आठवडय़ातील चढय़ा तापमानानंतर गुरुवारपासून उपनगरातील किमान तापमानात घट होऊन ते २० अंशाखाली घसरले. रविवारी सांताक्रूझ केंद्रावर १८.४ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. तर कुलाबा केंद्रावर शनिवारच्या तुलनेत एक अंशाची वाढ झाली. पुढील दोन दिवस तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र कमाल तापमानात घट न होता सांताक्रूझ केंद्रावर ३५.३ अंश नोंद झाली. दरम्यान, आद्र्रतेच्या प्रमाणात सरासरीच्या तुलनेत ६ ते ९ टक्क्यांची घट झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 12:12 am