11 August 2020

News Flash

‘सेरो’ सर्वेक्षणासाठी सहकार्य करा; पालिकेचे आवाहन

रक्ताचे नमुने घेऊन हे सर्वेक्षण केले जाणार

(संग्रहित छायाचित्र)

करोना संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी मुंबईत निती आयोग आणि ‘टीआयएफआर’ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय ‘सेरो’ सर्वेक्षण गेल्या आठवडय़ापासून सुरू झाले आहे. रक्ताचे नमुने घेऊन हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अतिसंक्रमित भागांमध्ये या संक्रमणाचा होणारा भौगोलिक फैलाव समजून घेण्यासाठी व या संक्रमणाचे सामाजिक धोके समजून घेण्यासाठी या सर्वेक्षणाची मदत होणार आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८ वर्षांवरील व्यक्तींना यात सहभागी करून घेतले जाईल. मुंबईत चेंबूर- गोवंडीचा भाग असलेला एम पश्चिम, परळ -शिवडीचा भाग असलेला एफ उत्तर आणि दहिसर या भागात हे सर्वेक्षण होणार आहे. रहिवाशांच्या संमतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रक्ताचे नमुने घेऊन त्यातील प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तपासण्यात येतील. रक्तात प्रतिपिंडे तयार होणे हे बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे लक्षण आहे. या माहितीच्या आधारे संक्रमणाचा सामुदायिक प्रसार रोखण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी निवडलेल्या तिन्ही भागांमध्ये ज्या उंच इमारतीची तसेच गृहनिर्माण संकुलाची निवड झालेली असेल तेथील रहिवाशांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:55 am

Web Title: collaborate for a sero survey appeal of the municipality abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती आता ई-मेलवर
2 दोन किलोमीटरची अट मागे घेण्याबाबत पोलिसांचे मौन
3 जप्त वाहने सोडवताना हाल!
Just Now!
X