मुंबई शहर भागातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून सोमवारपासून राज्यातील महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबईतील महाविद्यालये बंदच राहणार आहेत.

राज्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई पालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने राज्यातील इतर अनेक भागातील महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालये बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २२ फेब्रुवारीपूर्वी सूचना देण्यात येतील, असे पत्र  पालिकेने विद्यपीठाला दिले आहे.

सर्वासाठी लोकल सुरू झाल्यानंतर करोनाचे रुग्ण वाढत आहेत का याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे पालिकेने पत्रात नमूद केले आहे.