‘बिग बॉस १४’चा स्पर्धक व गायक जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले आणि त्यानंतर वाद सुरू झाला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर अन्य पक्षाच्या नेत्यांनी जान कुमार सानू आणि कलर्स वाहिनीला इशारा दिला. वाढता विरोध पाहता कलर्स वाहिनीकडून एक माफीनामा सादर करण्यात आला. मात्र इंग्रजी-मराठी भाषेतील पत्रावरून आता मनसेनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’. कलर्स वाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे,’ असं ट्विट अमेय खोपकरांनी केलं आहे.

कलर्स मराठीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इंग्रजीत आणि राज ठाकरेंना मराठीत माफिनाम्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. यावरूनच आता पुन्हा एकदा मराठीचं राजकारण रंगलं आहे.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

मनसे नेते अविनाश जाधव यांनी फेसबुकवर माफिनामा पोस्ट करत लिहिलं, ‘शुद्ध मराठीतील माफीनामा…बाकीच्यांसारखे इंग्रजी लेटर घेऊन शांत बसले नाहीत! महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे.’

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. “मराठी भाषेत माझाशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असं खळबळजनक वक्तव्य त्याने केलं. या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्रात राहून देखील त्याला मराठी भाषेचा इतका राग का येतो? असा संतप्त सवाल केला जात आहे. शिवाय काही नेटकरी तर त्याला बिग बॉसमधून बाहेर काढावं अशीही मागणी करत आहेत.

कलर्स वाहिनीनं झालेल्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. “कलर्स वाहिनीवर २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या भागासंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. आम्ही याची दखल घेतली असून ज्या ठिकाणी ते वक्तव्य आहे तो भाग आम्ही सर्व ठिकाणांहून काढून टाकत आहोत. मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखावली गेली याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आमच्या प्रेक्षकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि आमच्यासाठी सर्व भाषा एकसमान आहेत,” असं कलर्स वाहिनीनं पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.