News Flash

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांना जामीन मंजूर

ड्रग्ज प्रकरणात करण्यात आली होती दोघांना अटक

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे. या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीने ही कारवाई केली होती. आता या दोघांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. ड्रग्ज पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. जो मंजूर करण्यात आला असून दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.

कोण आहे भारती सिंह?

भारती सिंह ही एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आहे. २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो’ या स्पर्धेतून भारतीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या अनेक स्टँडअप कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय ती ‘एफ. आय. आर.’, ‘बिग बॉस’, ‘अदालत’, ‘खिलाडी 786’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 3:12 pm

Web Title: comedian bharti singh and her husband haarsh limbachiyaa granted bail by a special ndps court in mumbai scj 81
Next Stories
1 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार?-प्रकाश आंबेडकर
2 NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला
3 आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीचं नंतर बघू; शिवसेनेचा फडणवीसांवर हल्ला
Just Now!
X