News Flash

‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’चा शेवटचा भाग प्रसारितच न झाल्याने हळहळ

शेवटच्या भागासाठी अभिनेता अक्षय कुमार याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते

शेवटच्या भागासाठी अभिनेता अक्षय कुमार याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. शेवटच्या भागाची एक व्हिडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या अनेकांच्या लाडक्या टीव्ही शोच्या शेवटचा भागाचे ‘कलर्स’ वाहिनीने रविवारी रात्री प्रसारणच न केल्याने अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’चा १७ जानेवारीला शेवट होणार असल्याचे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने मागच्या आठवड्यातच जाहीर केले होते. या भागाचे चित्रीकरणही पूर्ण झाले होते. पण ‘कलर्स’ वाहिनीने त्याचे प्रसारणच रविवारी रात्री केले नाही. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.


घरातील प्रत्येकाची हसवणूक करणारा ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा कार्यक्रम अल्पावधीतच नावारूपाला आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘कलर्स’ वाहिनीवरून ‘कॉमेडी नाईट्स बचाव’ हा स्वतंत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यावेळीच ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’चा लवकरच शेवट होणार हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात कपिल शर्मा याने शेवटच्या भागाची तारीख जाहीर केली होती. कालसुद्धा त्याने ‘ट्विटर’च्या माध्यमातून शेवटचा भाग ‘कलर्स’ वाहिनी प्रसारित करेल, असे जाहीर केले होते. पण वाहिनीने हा भागच प्रसारित केला नाही.
दरम्यान, शेवटच्या भागासाठी अभिनेता अक्षय कुमार याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. शेवटच्या भागाची एक व्हिडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या शोमध्ये गुत्थीचे पात्र साकारणारा सुनील ग्रोव्हर चित्रीकरणावेळी भावनिक झाला. त्याला आपले अश्रूही आवरता आले नाहीत. ‘आप आए है इस बगियां मै, फूल खिलें है गुलशन गुलशन’ या ओळीही त्याला गाता आल्या नाहीत. यावेळी स्वतः कपिल शर्मा याच्यासह इतर सर्वच कलाकार भावनिक झाल्याचे व्हिडिओवर पाहायला मिळते. या शोचे खास आकर्षण असलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना सुद्धा शेवटच्या भागावेळी आपले अश्रू अनावर झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2016 3:42 pm

Web Title: comedy nights with kapil channel drops final episode of kapils show
Next Stories
1 तरूणींपासून लांब पळतोय अनिकेत विश्वासराव!
2 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘हलाल’
3 महिलेला मारहाणप्रकरणी नवाजुद्दीनविरोधात तक्रार दाखल
Just Now!
X