News Flash

जकात नाक्यांचा व्यावसायिक वापर

जकात नाक्यांवर वाहतूक हब उभारल्यानंतर मुंबईबाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या तिथे थांबवल्या जाणार आहेत.

वाहतूक, व्यावसायिक हब तयार करण्याचा विचार;मुंबईबाहेरून येणाऱ्या गाड्या वेशीवरच थांबणार 

मुंबई :  वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जुलै २०१७ पासून ओस पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेचा वापर करण्यासाठी पालिकेची पुन्हा सल्लागाराकडून प्रस्ताव मागवले आहेत. दहिसर, मुलुंड, ऐरोली, वाशी, मानखुर्द अशा पाच जकात नाक्यांच्या १६ एकर जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हब उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. रिकाम्या असलेल्या जागेच्या वापरातून पालिकेला महसूल मिळू शकणार आहे. या जागेवर वाहतूक हब उभे राहिल्यास मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवासी गाड्या तिथेच थांबवल्या जाणार आहेत.

पालिकेची जकातवसुली १ जुलै २०१७ पासून बंद झाल्यामुळे शहराच्या सीमांवर असलेले पाचही जकात नाके गेल्या चार वर्षांपासून ओस पडले आहेत. या जकात नाक्यांवर अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून या जागेचा वापर करण्याबाबत विविध सूचना नगरसेवकांनी केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी पालिकेने या जागेच्या वापरासाठी सल्लागारांकडून प्रस्तावही मागवले होेते. मधल्या काळात पालिकेने ही जागा सागरी मार्गाच्या कामासाठी कार्यशाळा म्हणून वापरण्याचे ठरवले होते. मात्र सागरी मार्गापासून जकात नाके  दूर असल्यामुळे तो पर्यायही नाकारण्यात आला. त्यामुळे आता पालिकेने  पुन्हा जागेच्या विकासासाठी सल्लागारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. सल्लागारांना ९ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

जकात नाक्यांवर वाहतूक हब उभारल्यानंतर मुंबईबाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या तिथे थांबवल्या जाणार आहेत. तसेच ट्रक टर्मिनलही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रदूषणही कमी होईल. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या मुंबईत काही ठराविक ठिकाणी उभ्या असतात.  प्रवाशांच्या प्रतीक्षेत या गाड्या अर्धा तास रस्ता अडवून उभ्या असतात. प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा नसताना गाड्या रस्त्यावर उभ्या असतात. त्यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मात्र जकात नाक्यांवरली हबमुळे हा त्रास कमी होणार आहे.

या जागेवर ‘वाहतूक आणि व्यावसायिक हब’ उभारण्याचा विचार असून त्यातून किती महसूल मिळू शके ल यांसाठी सल्लागारांकडून आर्थिक आराखडा मागविण्यात येणार आहे. पाच जकात नाक्यांच्या जागेसाठी आलेल्या आराखड्यातून पालिकेची समिती योग्य आराखड्याची निवड करेल आणि त्यानुसार हे काम सल्लागाराला दिले जाईल.

– सुरेंद्र बोराळे, वास्तूविशारद, पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:34 am

Web Title: commercial use of toll booths gst akp 94
Next Stories
1 ८१४ मुंबईकरांवर खटले
2 विकासकांना घसघशीत सूट
3 महापौरांच्या अडचणीत वाढ
Just Now!
X