मुंबई : तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगकडून नॉटीकल अॅडव्हायझरची समिती नेमण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडूनही या प्रकरणी चौकशी सुरू असून आतापर्यंत दुर्घटनेतून बचावलेल्या सात जणांचे जबाब नोंदविले आहेत.
तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५’ तराफा बुडून ७५ जणांना जलसमाधी मिळाली. तर वरप्रदा नौकेच्या दुर्घटनेत ११ जणांचा बळी गेला आहे. नॉटीकल अडव्हायझरच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती घटनेची चौकशी करणार आहे.दरम्यान मुंबई पोलिसांनी ही ‘पी ३०५’ दुर्घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच चौकशी सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.