News Flash

मुक्ता बर्वेशी संवाद साधण्याची संधी

आपल्या वैविध्यपूर्ण आणि ताकदवान भूमिकांमुळे चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या

| March 6, 2014 06:23 am

आपल्या वैविध्यपूर्ण आणि ताकदवान भूमिकांमुळे चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून येत्या शुक्रवारी (दि. ७) मिळणार आहे. ठाण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी मंगळवारी वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या प्रवेशिका आता संपल्या आहेत.
पुण्याच्या ललित कला केंद्रातून नाटय़शास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मुक्ता बर्वेने रंगभूमी तर गाजवलीच, पण ‘जोगवा’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘आघात’, ‘एक डाव धोबीपछाड’ असे विविधरंगी चित्रपटही केले. ‘देहभान’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘छापा काटा’सारख्या आशयघन नाटकांमधून तिने आपल्या चतुरस्र अभिनयाची चुणूक दाखवली. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही तिच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. ‘अग्निहोत्र’मधली तिची मंजुळा आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली राधा अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता ‘छापा काटा’द्वारे ती नाटय़निर्मातीही बनली आहे.
या नव्या भूमिकेविषयी तसेच नाटय़शास्त्राची बुद्धिमान विद्यार्थिनी ते एक प्रगल्भ अभिनेत्री या प्रवासाविषयी व्हिवा लाउंजच्या मंचावरून तिच्याकडूनच ऐकायला मिळणार आहे. या निमित्ताने व्हिवा लाउंजची मैफल प्रथमच ठाण्यात रंगणार आहे.
टिप-टॉप प्लाझा या कार्यक्रमाचा व्हेन्यू पार्टनर आहे. झी २४ तास हा कार्यक्रमाचा टेलिव्हिजन पार्टनर
आहे.
*कधी – शुक्रवार, ७ मार्च
*कुठे – टिप-टॉप प्लाझा, लालबहादूर शास्त्री मार्ग, ठाणे (पश्चिम)
*वेळ – दु. ३.४५ वाजता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2014 6:23 am

Web Title: communicate with mukta barve in viva lounge at thane
टॅग : Viva Lounge
Next Stories
1 आचारसंहिता लागल्यानंतरही ८४.६८ कोटींचे प्रस्ताव मंजूर
2 मराठी रिक्षाचालकांचे लॉटरीतही ‘नशीब’ फुटकेच
3 ‘शोले स्टाइल ’आत्महत्या धमकीचे नाटय़
Just Now!
X