वडाळ्याहून चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनो रेल वीजपुरवठा खंडित झाल्याने भक्तिपार्क येथे अडकली होती.
वडाळ्याहून चेंबूरच्या दिशेने जाणारी मोनोरेल भक्ती पार्क स्टेशनदरम्यान अडकली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी उंच शिडीवरुन प्रवाशांना बाहेर काढले. मोनो रेलमधून ११ प्रवासी आणि २ मोनो चालकांना बाहेर काढण्यात आले. सकाळी साडे आठच्या सुमारास अडकलेली मोनोरेल सेवा तब्बल तीन तासांच्या खोळंब्यानंतर सुरु झाली. पण मोनोरेलच्या खोळंब्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.