21 September 2020

News Flash

कंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन

विद्यार्थ्यांना संगणकावरच ही परीक्षा देता येईल.

संग्रहित छायाचित्र

इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा (सीएसईईटी) २९ ऑगस्ट रोजी ऑनलाइन  पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे.

आयसीएसआयने यंदापासून कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या टप्प्यांपूर्वी प्रवेश परीक्षा घेण्याची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना संगणकावरच ही परीक्षा देता येईल. मोबाइल, टॅब्लेट अशा साधनांवर परीक्षा देता येणार नाही.

परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल. ‘बिझिनेस कम्युनिकेशन’, ‘लीगल अ‍ॅप्टिटय़ूड अँड लॉजिकल रिझनिंग’, ‘इकॉनॉमिक्स अँड बिझिनेस एन्व्हायर्नमेंट’, आणि ‘करंट अफेअर्स, प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल्स’ अशा चार विषयांची प्रत्येकी ५० गुण अशी २०० गुणांची परीक्षा होणार आहे. पहिल्या तीन विषयांसाठी ३५ प्रश्न असतील. ताज्या घडामोडींवरील (करंट अफेअर्स) १५ प्रश्न, आणि सादरीकरण आणि संवाद कौशल्य या विषयांवरील २० प्रश्न असतील. एकूण दोन तासांची (१२० मिनिटे) ही परीक्षा असेल. तोंडी परीक्षा घेण्यात येणार नाही. परीक्षेपूर्वी १० दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रे देण्यात येतील. परीक्षेबाबत अधिक माहिती www.icsi.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:04 am

Web Title: company secretary entrance exam online abn 97
Next Stories
1 मुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त
2 वकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत!
3 ऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध
Just Now!
X