News Flash

‘इंदू मिल’चे श्रेय घेण्यासाठी दलित नेत्यांमध्ये चढाओढ

इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याच्या मागणीला पुन्हा जोर आला असून, या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आणि त्याचे

| November 15, 2013 05:19 am

इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याच्या मागणीला पुन्हा जोर आला असून, या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी दलित नेत्यांमध्येही चढाओढ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व कामगार नेते विजय कांबळे यांनी २२ नोव्हेंबरलाच मिलचा ताबा घेण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी तर ६ डिसेंबरला मिलमध्ये घुसून स्मारकाचे भूमिपूजन करण्याची घोषणा केली आहे. तर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन देण्याचे मान्य केले, त्याला दोन वर्षे उलटली. संसदेत त्यासंबंधी अधिकृत घोषणा झाल्यालाही एक वर्ष होत आले. तरीही स्मारकाबाबत अतिशय धिम्या गतीने वाटचाल सुरू आहे, सरकार मुद्दाम वेळकाढूपणा करीत आहे, असे विजय कांबळे यांचे म्हणणे आहे. सामाजिक समता मंच या संघटनेचे कार्यकर्ते २२ नोव्हेंबरला इंदू मिलचा ताबा घेतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
आंबेडकर स्मारकाबाबत सरकार चालढकल करीत असल्याचा रामदास आठवले यांचाही आरोप आहे. ५ डिसेंबपर्यंत स्मारकाचे भूमिपूजन न झाल्यास रिपाइंचे कार्यकर्तेच मिलमध्ये घूसून हा कार्यक्रम पार पाडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात आठवडाभरात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची याची घोषणा ते २१ नोव्हेंबरला संघटनेच्या मेळाव्यात करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:19 am

Web Title: competition to take indu mill credit in dalit leadership
Next Stories
1 अधिक जबाबदारीने काम करा – उच्च न्यायालयाचा महापालिका, म्हाडाला निर्देश
2 मोनो आपत्कालीन चाचणीतून पार
3 मालाडच्या जलबोगद्याला तडे..
Just Now!
X