News Flash

‘बेस्ट’ प्रवाशांकडून वाहकांविरोधात ३९१ तक्रारी!

सध्या बेस्टकडून चार हजारांहून अधिक बसगाडय़ा चालवल्या जातात.

तिकिटासाठी सुटे पैसे द्या, नाही तर बसमधून उतरा असे प्रवाशांना ठणकावून सांगणाऱ्या वाहकापासून, गाडी बस थांब्यावर न थांबलेल्या चालकापर्यंत गेल्या चार महिन्यांत बेस्ट प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस पडला आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यांत बेस्ट प्रशासनाकडे वाहक-चालकांविरोधात ३९१ तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहे. यात ‘चिल्लर’ वादाचे प्रमाण अधिक असल्याचे समजते.

सध्या बेस्टकडून चार हजारांहून अधिक बसगाडय़ा चालवल्या जातात. यातून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे २८ लाखांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांत ही संख्या लाखोंनी घटली. याचे मुख्य कारण बेस्टचे भाडे शेअर रिक्षा-टॅक्सींच्या तुलनेत अधिक असल्याचे अधोरेखित केले जात आहे. मात्र प्रवाशांकडे उद्धटपणे वागणाऱ्या वाहक आणि चालकांमुळेही बेस्टचे प्रवासी दुरावल्याचा आरोप बेस्ट समितीचे सदस्य करत आहेत. यात सुटय़ा पैशांवरून होणाऱ्या वादाचे प्रमाण अधिक आहे. बेस्टकडून वाहकाला १०० रुपयांची चिल्लर (सुटे पैसे) दिली जाते. मात्र प्रवाशांची संख्या पाहता वाहकाला सुटे पैसे देताना हात आखडता घ्यावा लागतो. यात अनेकदा प्रवासी आणि वाहकांत वाद होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 2:42 am

Web Title: complaint against best bus drivers
Next Stories
1 विधिमंडळ अधिवेशन : उपसभापतिपदाची काँग्रेसला प्रतीक्षाच!
2 पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचे कोटय़वधी रुपये पडून
3 रिक्षा-टॅक्सी संपाला प्रमुख संघटनाचा पाठिंबा नाही!
Just Now!
X