News Flash

अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी तक्रार करा

अनधिकृत फलक आणि भित्तीपत्रकांची तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

मुंबई महानगर पालिका

मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन
‘स्वच्छ भारत अभियाना’च्या जनजागृतीसाठी पालिकेने आता सार्वजनिक ठिकाणी झळकविण्यात येणारे कापडी फलक, भित्तीपत्रकांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून अनधिकृत फलक आणि भित्तीपत्रकांची तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. थेट कारवाई करण्याऐवजी नागरिकांच्या तक्रारीची प्रतीक्षा का करीत आहे, असा सवाल मुंबईकर विचारू लागले आहेत.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस, सभा, समारंभ, धार्मिक कार्यक्रम आदींच्या फलकबाजीमुळे मुंबई विद्रुप झाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायालयाने मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यावेळी तीन दिवस कठोर कारवाई करीत पालिकेने मुंबईमधील अनधिकृत बॅनर्स काढून टाकले होते. ‘स्वच्छ भारत अभियाना’ची पाहणी करण्यासाठी नवी दिल्ली येथून एक पथक मुंबईत दाखल होत असल्याचा सुगावा लागताच पालिकेने ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे वेगवेगळ्या आकाराचे फलक संपूर्ण शहरात झळकविले. परिणामी मुंबई महापालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पालिकेने २६ जानेवारीपूर्वी मुंबई फलकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत कापडी फलक, भित्तीपत्रांबाबत तक्रारी टोल फ्री क्रमांक १२९२ व १२९३ वर दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६९१२९१ व २२६९१२९३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2016 2:15 am

Web Title: complaint against illegal hoarding bmc appeal to civilian
टॅग : Bmc,Illegal Hoardings
Next Stories
1 रेडिओ सिटी फ्रीडम अॅवॉर्डसचे तिसरे पर्व!
2 सहकार सचिवपदी एस. एस. संधू यांची नियुक्ती
3 छोटा राजनच्या चौकशीला सीबीआयला हिरवा कंदील
Just Now!
X