News Flash

वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे कैफियत

कोणतीही अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, वरिष्ठांकडून छळ होत असेल तर, कारवाई केली जाईल

(संग्रहित छायाचित्र)

वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून जाच होत असल्याची कैफियत महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्यासमोर मांडण्यात आली. त्यावर कोणतीही अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, वरिष्ठांकडून छळ होत असेल तर, कारवाई केली जाईल, असा दिलासा मंत्री ठाकूर यांनी या महिला कर्मचाऱ्यांना दिला. वन विभागातील अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर या विभागातील महिलांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आले. या पाश्र्वाभूमीवर महिला व बालविकास मत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटचा दौरा करुन काही वन विभागाच्या कार्यालयांना भेटी देऊन तेथील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, गंभीर तक्रारी आपल्याकडे केल्या आहेत. त्यावर या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी असे निर्देशही त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:54 am

Web Title: complaint of women employees of forest department to the minister abn 97
Next Stories
1 मुलाबरोबर मनसोक्त वेळ घालवण्यावर करोनामुळे निर्बंध
2 रिक्षाचालक रडकुंडीला!
3 करोनाकाळात अनाथांचा जीवनसंघर्ष खडतर
Just Now!
X