हत्येची धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. अभिनेता आदित्य पांचोलीने एका कार मॅकेनिकला ठार करण्याची धमकी दिली. ज्यानंतर हा मॅकेनिक पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आदित्य पांचोलीविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.

आदित्य पांचोलीने या मॅकेनिककडे त्याची कार दुरुस्तीसाठी दिली होती. त्या कार दुरुस्तीचे बिल २ लाख ८२ हजार १५८ रुपये झाले होते. या बिलाचे पैसे मागितल्यानंतर आदित्य पांचोलीने आपल्याला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील चौकशी सुरु आहे.