|| नमिता धुरी

मोडी लिपीतील कागदपत्रांचे संगणकीकरण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांच्यासह दहा मराठी राज्यकत्र्यांनी दक्षिणेत राज्य के ले. मराठ्यांच्या या १८० वर्षांचा राजवटीचा इतिहास सांगणारी मोडी लिपीतील कागदपत्रे लवकरच संगणकावर उपलब्ध होणार आहेत. ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने राबवलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा फे ब्रुवारीत पूर्ण होणार असून यात ५ लाखांहून अधिक कागदपत्रांच्या संगणकीकृत प्रतिमा उपलब्ध होतील.

दक्षिणेतील मराठी राजवटीची राजधानी तमिळनाडूतील तंजावर येथे होती. राज्यकारभाराची भाषा मराठी व लिपी मोडी होती. या कालखंडातील समाजजीवन, इतिहास, प्रशासन, राजकारण, शैक्षणिक व सांस्कृतिक धोरण, वैद्यकीय इत्यादी विषयांची माहिती असलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. मराठी राज्य खालसा झाल्यानंतर तमिळनाडू सरकारने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली मोडी लिपीतील कागदपत्रे तंजावरच्या तमिळ विद्यापीठाकडे सोपवली. २०१० सालच्या सांस्कृतिक धोरणानुसार ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने २०१३ मध्ये तमिळ विद्यापीठाशी करार करून कागदपत्रे ताब्यात घेतली आणि त्यांचे संगणकीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ५ लाख ८८ हजार ५०० कागदपत्रांवर काम सुरू करण्यात आले. या टप्प्याच्या पहिल्या भागात ३ लाख ७६ हजार कागदपत्रांच्या ५ लाख ८ हजार २०१ संगणकीकृत प्रतिमा तयार झाल्या आहेत. दुसऱ्या भागात २ लाख १२ हजार ५०० कागदपत्रांवर तमिळ विद्यापीठात काम सुरू आहे. त्याच्या ४ लाख प्रतिमा तयार झाल्या आहेत. उर्वरित काम फे ब्रुवारीत पूर्ण होईल. या कागदपत्रांची सूची देवनागरीत तयार करणार आहे. अतिमहत्त्वाच्या मोडी कागदपत्रांचे लिप्यंतर-भाषांतर करण्यात येईल. सर्व संगणकीकृत प्रतिमा संस्थेच्या संके तस्थळावर विनामूल्य उपलब्ध होतील.

दाक्षिणात्य प्रभाव

मोडी कागदपत्रांवर दक्षिणेतील भाषा, साहित्य, संस्कृती यांचा प्रभाव दिसतो. यातील लेखनशैली वेगळी आहे. तंजावर राज्यकत्र्यांची माहिती देवनागरीत, इंग्रजीत फारशी उपलब्ध नाही. या प्रकल्पामुळे अभ्यासकांना तंजावर राजवटीबाबतचे साहित्य उपलब्ध होईल.

कागदपत्रे हाती आली तेव्हा अत्यंत वाईट अवस्थेत होती. वाळवी लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आधी त्यांची साफसफाई करण्यात आली. डागडुजीसाठी जपानी तंत्रज्ञान वापरण्यात आले. कागदपत्रांच्या घड्या सोडवून त्यावर विशिष्ट रसायन आणि हस्तनिर्मित कागद लावण्यात आला. आता या कागदपत्रांचे आयुर्मान २५० ते ३०० वर्षांनी वाढले आहे.  या प्रकल्पामुळे तंजावर येथील मराठा राजवटीचा इतिहास जतन के ला जाईल. – डॉ. अशोक सोलनकर, प्रकल्प प्रमुख