मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी एका नौदलाच्या अधिकाऱ्याला बलात्काराच्या खटल्याचा तपास संपल्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला. परंतु यावेळी न्यायालयाने बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना, “कंडोम वापरले याचा अर्थ असा नाही की संमतीने सेक्स केला”, अशी टीप्पणी केली आहे. एका नौदलातील कर्मचाऱ्यावर सहयोगी मित्राच्या पत्निवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्या जामीनाच्या याचीकेवर न्यायालयात सुनावणी सुरु होती.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, “केवळ घटनास्थळी कंडोम उपस्थित असल्यामुळे तक्रारदाराचे आरोपीशी सहमतीचे संबंध होते, असे म्हणणे पुरेसे नाही. असेही होऊ शकते की आरोपीने पुढील त्रास टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला.”

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

एका नौदल कर्मचाऱ्यावर बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. नौदलातील जवानावर त्याच्या सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. न्यायालयात त्याने दावा केला होता की संबंध दोन्ही बाजूने संमतीनंतरच केले गेले. या दाव्याच्या समर्थनार्थ ते कंडोम लावण्याविषयी बोलले होते, त्यावर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

हेही वाचा – मुलीने कंडोम खरेदी करण्यात चुकीचं काय?; अभिनेत्रीचा संतप्त सवाल

आरोपीने पीडितेला पतीला सांगू नको, असे धमकावले होते. मात्र, तिने तिच्या पतीला ही घटना सांगितली आणि त्याने लगेच येऊन पोलिसांना कळवले. आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. जामिनावरील सुनावणी दरम्यान, आरोपींकडून हजर असलेले वकील नीलेश दलाल यांनी युक्तिवाद केला की, त्याला फसवले जात आहे. कारण त्यावेळी घरात आणखी एक व्यक्ती उपस्थित होती आणि तिच्यावर बलात्कार करणे त्याला शक्य नव्हते.

दरम्यान, सरकारी वकील कल्पना हिरे यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला कारण तपास संपला असला तरी आरोपी पीडितेला आणि तिच्या पतीला धमकावू शकतात, अशी सर्व शक्यता आहे.