05 August 2020

News Flash

टॅक्सींवरील इंडिकेटरला संघटनांचा विरोध

इंडिकेटरची सक्ती केली तर आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

परिवहन आयुक्तांना पत्र

मुंबई : काळ्या-पिवळ्या टॅक्सींची प्रवाशांना उपलब्धता समजण्यासाठी रुफलाइट इंडिकेटर बसवण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला असतानाच त्याला टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. गेल्या चार वर्षांत टॅक्सीचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले असून त्यामुळेच हा विरोध असल्याचे परिवहन आयुक्तांना दिलेल्या पत्रात मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने नमूद केले आहे. परिणामी प्रवाशांसाठी असलेली ही सुविधा बारगळण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अ‍ॅपआधारित टॅक्सींवर अंकुश ठेवण्यासाठी आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांनाही टॅक्सी समन्वयक कंपन्यांचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई शहर टॅक्सी योजना आखण्यात आली होती. त्यानंतर भाडेदर निश्चित करण्यासाठी खटुआ समितीही नेमण्यात आली. मात्र समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी तर दूरच, त्या विचारातही घेण्यात आलेला नाहीत. प्रत्येक किलोमीटरमागे सीएनजीची किंमतही वाढत असून त्यानुसार भाडेवाढही मिळालेली नाही. शासनाने चालकांचा विचार केला नसल्याने टॅक्सीच्या छतावर बसवण्यात येणाऱ्या इंडिकेटरला विरोध करत असल्याचे संघटनेचे महासचिव ए.एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबाहेरूनही सुरू केलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी सेवांसाठी याची गरजच नसून प्रवाशांना सहज टॅक्सी उपलब्ध होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंडिकेटरची सक्ती केली तर आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 2:03 am

Web Title: confederates opposition to taxis indicators akp 94
Next Stories
1 मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम
2 जैवविविधता नोंदवह्य़ा तयार करण्याचे काम हे केवळ नाटक
3 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष
Just Now!
X