News Flash

विवेकानंद विचारांवर शिकागोत संमेलन व्हावे- अडवाणी

राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित संमेलनाचे शिकागो येथे आयोजन करावे व त्यास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एकत्रितपणे संबोधित करावे,

| February 25, 2013 02:40 am

राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित संमेलनाचे शिकागो येथे आयोजन करावे व त्यास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एकत्रितपणे संबोधित करावे, अशी विनंती ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रपतींना केली आहे.
दिवंगत भाजप नेते हशू अडवाणी यांच्या ८७ व्या जन्मदिनानिमित्ताने चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये अडवाणी शनिवारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदाची १५० वी जन्मशताब्दी देशभरात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने उपरोक्त विनंती अडवाणींनी राष्ट्रपतींना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:40 am

Web Title: conference should be taken on vivekanand thots in chicago adwani
Next Stories
1 मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूचा मृत्यू
2 उपनगरीय रेल्वेसाठी हजार कोटी द्या!
3 पासवर्ड हॅकिंगबाबत बँक अधिकाऱ्यांची ‘अळीमिळी’
Just Now!
X