28 May 2020

News Flash

काश्मिरी विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षणाबाबत संभ्रम

राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये आरक्षणाबाबत कोणता तोडगा काढला जातो, त्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर आता यंदाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे यंदा प्रवेशप्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम केंद्र सरकारने रद्द केले. त्याचा परिणाम आता राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक संस्थेत काही जागा राखीव ठेवण्यात येतात. या राज्याला मिळालेल्या विशेष दर्जानुसार ही तरतूद करण्यात आली होती. या जागांसाठी काश्मीरमधील विद्यार्थी दरवर्षी अर्ज करतात. राज्याचा विशेष दर्जा रद्द झाल्यामुळे या राखीव जागा ठेवाव्यात का, याबाबत संभ्रम आहे. या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात की अखिल भारतीय कोटय़ातील १५ टक्के जागांमध्ये प्रवेश द्यायचे, असा संभ्रम आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रत्येक महाविद्यालयांत किती जागा उपलब्ध आहेत, त्याची माहिती द्यावी लागते. त्यानुसार या राखीव जागा ठेवण्याबाबत प्रवेश नियमन प्रधिकरणाने उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्याबाबत अद्यापही विभागाने काहीच उत्तर दिले नसल्याचे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये आरक्षणाबाबत कोणता तोडगा काढला जातो, त्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 1:07 am

Web Title: confusion about reservation for kashmiri students abn 97
Next Stories
1 प्राध्यापक प्र. ना. परांजपे यांना ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’
2 आघाडीचे सबुरीचे धोरण
3 ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चे १०२ गुन्हे
Just Now!
X