रेल्वेभाडेवाढीविरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी राज्यात विविध ठिकाणी रेलरोको आंदोलन केले. पुणे, नागपूर, वर्धा, अकोला यासह राज्यातील विविध शहरांतील रेल्वेस्थानकावरील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्या. यावेळी रेल्वेभाडेवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आला.
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवाही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून धरली होती. ठाणे स्थानकात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल रोखून धरली. मात्र, काही प्रवाशांनी या आंदोलनाच्याविरोधातच आवाज उठविल्यानंतर तेथील आंदोलन मागे घेण्यात आले. लोकल प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही मुंबईत केवळ ११ ते १२ या एक तासासाठीच रेलरोको आंदोलन केल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. रेल्वेने जाहीर केलेली भाडेवाढ पूर्णपणे रद्द करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 1:40 am